Here is 6th standard History Subject Second Term Question Paper with Answers by Mukhyadhyapak sangh 2024.
प्रश्न 1:
अ) योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा:
भारतीय वैदक शास्त्राला आयुर्वेद म्हटले जाते.
कुषाण
ब) योग्य जोड्या जुळवा:
रामायण – वाल्मीकी
महाभारत – व्यास
अ)
कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर — कनिष्कपूर
कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव — कुंतल
प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये — रामायण आणि महाभारत
रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे — अरिकामेडू
ब)
हर्षवर्धन याने संस्कृतमध्ये तीन नाटके लिहिली — रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद. ही नाटके मुख्यतः प्रेमकथा आणि धार्मिक भावनांवर आधारित आहेत.
दक्षिण भारतात चोल, पांड्य, आणि चेर या प्रमुख प्राचीन राजसत्ता होत्या. या राजसत्तांनी दक्षिण भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलला.
प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठे म्हणजे — तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी. ही विद्यापीठे शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी प्रसिद्ध होती.
गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते.
प्रश्न3
1)
सम्राट कनिष्क हा कुषाण वंशाचा महान राजा होता. त्याच्या काळात चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवनेत आली होती . कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता.
2)
‘ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायला आहे’, असा त्याचा अर्थ होतो. तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलले होते.
3)
भगवद् गीतेत कर्तव्यनिष्ठा आणि निष्काम कर्मयोगाचा संदेश दिला आहे. कर्म करताना फलाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडा असा महत्त्वाचा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला.
4)
इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट ‘मिंग’ याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यपमातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली.
प्रश्न 4:
अ)
भारतात प्रथम महानगरपालिकेची स्थापना मुंबई येथे झाली.
जिल्हाधिकाऱ्यांचे नेमणूक राज्य शासनाकडून होते.
ब)
गावातील सर्व मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा.
महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत या संस्था समाविष्ट होतात.
जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो.
तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.
प्रश्न 5:
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभा अध्यक्षतेखाली नेतात, विविध समित्यांचे नियंत्रण ठेवतात, आणि विकास योजनांची अंमलबजावणी करतात. जिल्हा परिषदेच्यानिधीतून योग्य तो खर्च
करण्याचा अधिकार जिल्हापरिषदेच्या अध्यक्षाला असतो.- स्थायी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, बांधकाम समिती इत्यादी.
- पूर, आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरण फुटणे, बाँबस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला ‘आपत्ती व्यवस्थापन’ असे म्हणतात.